उपवासाचीकचोरी


 उपवासाचीकचोरी


उपवासाचे वेगवेगळे पदार्थ आपण सतत शोधात असतो सोपी पटकन होणारी हि कचोरी सर्वानाच
आवडेल उपवास नसतानाही करायला चांगली आहे


उपवासाची कचोरी

काय घ्याल ----४ उकडलेले बटाटे , १/२ वाटी उपवासाची भाजणी ,१/२ टी स्पून तिखट ,१टी स्पून मीठ
१/२ पोपटी (कमी तिखट ) मिरच्यांचे तुकडेबारिक किंवा भरड ,१ टी स्पून बेदाणे ,१ १/२ कप खोवलेला नारळाचा
चव ,३/४ कप साखर, १/४ कप दूध किंवा २ टे स्पून साय ,तळण्यासाठी रिफाईंड शेंगदाणा तेल

कसे कराल ----पारीसाठी ---बटाटे पूर्ण कुस्करून घेणे भाजणी, तिखट ,मीठ घालून छान गोळा मळून   घेणे
सारण -----खोबरे, मिरच्यांचे तुकडे, साखर, बेदाणे,दुघ किंवा साय  सर्व एकत्र करून सारण घट्ट शिजवून घेणे
ओले राहिल्यास ते कचोरीतून बाहेर येते
पारी साठी सारखे गोळे करून घ्यावेत गोल पारी वळून त्यात १ टी  स्पून   सारण भरून गोल गोळा वळून थोड्याश्या भाजणीत घोळवून घ्या म्हणजे
फुटणार नाही .मध्यम गरम तेलात सर्व कचोऱ्या ब्राउन रंगावर टाळून घ्या

महत्वाचे -----१ सारण चांगले कोरडे हवे नाहीतर कचोरी मऊ पडते
२----भाजणी  ऐवजी कुठलेही उपवासाचे पीठ वापरू शकता
३---ह्या प्रमाणाच्या ८/१० कचोऱ्या होतात  

टिप्पण्या

लोकप्रिय पोस्ट