पिकलेल्या पपईचा जॅम

पिकलेली पपई  सगळ्यांना आवडतेच असे नाही पण पिकलेल्या पपईचा जॅम
सगळ्यांना नक्की आवडेल
ह्या जॅम ला सुरेख  केशरी रंग येतो आणि चव पण छान  लागते  सगळ्यांना आवडते

पपई  जॅम सुंदर चव सर्वाना आवडणारी

काय घ्याल -----१ १/२ कप पिकलेल्या पपईचा गर  (पपईचे तुकडे करून मिक्सर मधून फिरवून गर करून घेणे
१ वाटी साखर ,१ टी स्पून वेलची पूड , १ टी स्पून लिंबाचा रस

कसे  कराल ---- पपईचा गर ,साखर सर्व एकत्र मिसळून गॅस वर ठेवून   छान घट्ट शिजवून घेणे होत आले कि
वेलची पूड ,लिंबाचा रस घाला चांगले एकत्र करून जॅम प्रमाणे घट्ट झाले कि गॅस बंद करा
गार  करून काचेच्या बरणीत  भरून ठेवा

महत्वाचे ----१---पपई केशरी रंगाची पिकलेली हवी कच्ची नको
२----- जॅम फ्रिज मध्ये बरेच महिने चांगला  राहतो
३-----बाहेर ठेवल्यास ४/५ दिवसात संपवावा लागतो

टिप्पण्या

लोकप्रिय पोस्ट