पेरूचा जॅम ((gauva jam )
आता ताज्या रसरशीत पेरूचा हंगाम सुरु झाला आहे .पुण्यातले मिळणारे पेरू जरा जाड सर सालीचे असतात
मी त्र्यंबकेश्वरहून आणलेल्या पेरूला अतिशय सुरेख चव आणि रंग आहे गर भरपूर साल पातळ असे हे पेरू फार चविष्ट
आहेत.
पेरूचा जॅम
काय घ्याल ----- ३ पेरू (कडक नकोत पण फार मऊ पण नकोत ),पेरूचा गर जेवढा असेल तेवढीच साखर ,१/२ टी स्पून हिरवा फूड कलर
१ टी स्पून लिंबाचा रस
कसे कराल ------पेरू स्वच्छ धुवून पुसून त्याच्या फोडी करून घ्या . कुकर मध्ये बंद भांड्यात ठेवून उकडून घ्या
जरा कोमट असताना सूप गाळतो त्या गाळणीने सर्व गर गाळून घ्या म्हणजे बिया गाळण्यावर राहतील . जेवढा गर असेल तेवढीच साखर घाला
गॅसवर ठेवून चांगले ढवळत राहा मध्यम घट्ट झाले कि त्यात फूड कलर घाला . १ टी स्पून लिंबाचा रस घाला . जॅम सारखे होईपर्यंत शिजवून घ्या
पूर्ण गार झाल्यावर भरतीत भरून ठेवा . अतिशय सुरेख लागतो आणि सुरेख दिसतो
महत्वाचे -----१) पेरू छान मऊ शिजणे आवश्यक आहे पाणी आजिबात जाऊ देऊ नये गॅस वर ३ शिट्या आणि ५ मिनटे
बारीक असे ठेवावे
२) फ्रिज मध्ये ठेवल्यास उत्तम राहतो अनेक महिने पण बाहेर ८/१० दिवस नक्की राहतो
३) साखरेचे प्रमाण कमी ज्यास्त करू शकता आवडी प्रमाणे पण मग फ्रिज मधेच ठेवावा
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा