हिरव्या ताज्या मिरचीचे लोणचे 

काय घ्याल 
 २ वाट्या हिरव्या मिरच्यांचे तुकडे ,४ टी  स्पून  मीठ,४ टी स्पून मोहोरीची भरड ( मोहोरी तव्यावर मंद शेकून  मिक्सर मध्ये भरड पूड करून घ्या )थोडी साले काढून टाका ,१/२ वाटी लिंबाचा रस 
१ टी  स्पून मेथी पूड ( मेथी तव्यावर मंद शेकून मिक्सरवर पूड करून घेणे ) २ टे स्पून तेल , १ टी स्पून मोहोरी 
१ टी स्पून हिंग ,१ टी  स्पून हळद 

कसे कराल 
मिरच्यांच्या तुकड्यावर लिंबाचा रस ,मीठ ,मोहोरी पूड, मेथी पूड  घालणे चांगले मिक्स  करणे . २ टे तेलात मोहोरी, हळद, हिंगाची खमंग फोडणी करणे  पूर्ण गार झाल्यावर फोडणी मिरर्च्यांवर घालणे चांगले मिक्स करून थोड्या थोड्या वेळाने ढवळून जरा घट्ट  झाले कि बरणीत  भरून ठेवणे 
फ्रिज मध्ये ठेवणे 

महत्वाचे 
१)  पोपटी रंगाच्या मिरच्या कमी तिखट असतात गडद हिरव्या मिरच्या खूप  तिखट असतात .
आवडीप्रमाणे घ्याव्यात
२)   लिंबू मिरची पण करू शकता १/२ वाटी  मिरच्या  कमी  करून   तेवढ्याच लिंबाच्या बारीक फोडी करून घालाव्यात







            

टिप्पण्या

लोकप्रिय पोस्ट