भोपळ्याच्या  गोड  पुऱ्या 


काय घ्याल -----
 २ वाट्या लाल भोपळ्याचा किस ,४ वाट्या कणीक ( आटा ),१/४ टी स्पून मीठ ,१ टे स्पून तूप किंवा तेल  ,१/४ वाटी बारीक रवा ,१ वाटी चिरलेला गूळ , तळण्यासाठी तेल 

कसे कराल ------
पातेल्यात किंवा कढईत  तेल घ्यावे  ते गरम झाले कि त्यावर भोपळ्याचा किस टाकावा झाकण ठेवून वाफ 
 द्यावी त्यात गूळ  टाकावा ढवळावे गूळ विरघळला कि भांडे खाली उतरवून त्यात कणिक, मीठ घालावे लागेल्यास पाणी घालून घट्ट गोळा मळून घ्यावा .१ /२ तास  झाकून ठेवावा मळून गोल  पुऱ्या लाटून घ्याव्यात 
गरम तेलात टाळून घ्या .  पेपर वर काढाव्यात  म्हणजे ज्यास्तीचे तेल टिपले जाईल 

महत्वाचे -------
१--तेल चांगले गरम असावे पुरी तळताना नाहीतर पुरी तेलकट होते 
२---पुरी फार पातळ नसावी नाहीतर कडक होते 
३---पुरीचा रंग ब्राउन  आला पाहिजे त्याप्रमाणे हीट नियंत्रित करावी 

टिप्पण्या

लोकप्रिय पोस्ट