Chakali Bhajani
नमस्कार
दिवाळीची पूर्वतयारी म्हणून आज मी ३ वेगवेगळ्या भाजण्या तुम्हाला देते आहे सर्वांची आवडती चकली भाजणी
चकली भाजणी
१--- चकली भाजणी --३ वाट्या तांदुळ जाडसर(
परिमल
किवा कुठलाही ) स्वच्छ धुवून २/३ दिवस सावलीत कपड्यावर पसरून ठेवणे
पूर्ण सुकले
पाहिजे ,१ आणि १/२ वाटी चणा डाळ ,३/४ वाटी उडदाची डाळ ,३/४ वाटी मु गाची डाळ ,सर्व डाळी कपडयावर टाकून स्वछ पुसून घेणे
१ वाटी जाड किंवा पातळ
पोहे ,१/२ वाटी जीरे
मंद आचेवर भाजून घेणे रंग बदलता कामा नये. पूर्ण गार झाल्यावर दळून आणणे .
कृती ---- ८ वाट्या भाजणी , ४ चहाचे चमचे (टी स्पून ) फार तिखट नको ,४ टी स्पून
मीठ ,३टी स्पून भाजलेले तीळ १ चमचा ओवा हे सर्व
भाजणीत मिसळून ठेवावे
. ह्या तयार मिक्सची चव बघावी .आवडीप्रमाणे तिखट मीठ घालावे
८ वाट्या भाजणीस १ वाटी तेल भांड्यात कुठल्याही गरम करून घ्यावे धूर काढू नये पण चांगले गरम हवे .
गॅस बंद करून टाकावा .त्यानं ८ वाट्या भाजणी घालावी चांगले सगळीकडून मिक्स करावे पीठाला गरम तेल छान
लागले पाहिजे
त्यात ४ वाट्या उकळलेले पाणी घालावे नीट मिसळून झाकून ठेवावे १ तास .चकली करायला घ्यायच्या आधी २वाट्या पाणी
कोमट करून घ्यावे.
पीठ मळताना लागेल तसे थोडे थोडे घालून
गोळा करून घ्यावा कढईत ३०० ग्राम तेल घालावे कागदावर
सोऱ्या किंवा चकली मेकर ने ३ चकल्या पाडून तळणीत सोडाव्यात परत ३ घालून ठेवा. सर्व एकदम घालू नयेत .मध्यम आचेवर
सर्व चकल्या तळून घ्याव्यात . तेल
तळून कमी होते तेव्हा परत घालावे परत
योग्य आच करून मगच तळावे चकल्या पूर्ण गार
झाल्यावरच घट्ट झाकणाच्या डब्यात भरून ठेवाव्यात
महत्वाचे ---------- १---तेलाचा धूर काढू नये पण भाजणी
घालण्या पूर्वी
चांगले गरम करावे
२----चकली तळणीत
सोडण्या पूर्वी तेल चांगले तापवून मध्यम आच करावी १ छोटी चकली तळून बघावी चव बघावी
काही हवे असल्यास घालून परत मळून सर्व चकल्या तळून घ्याव्यात .
३-----साधारण १/२ किलो तेल लागते .उरलेल्या तेलात शेव करून घ्यावी किंवा भाजी , आमटीला वापरून टाकावें
४-----५० ते ६० चकल्या होतात
अंजली गाडगीळ
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा