आपली आवडती करंजी
आपली आवडती करंजी
तयारी
सारण १मध्यम नारळ खरवडून फक्त पांढरे खोबरे घेणे ,साखर (खोबरे दाबून वाटीत भरून मोजणे त्याच्या निम्मी साखर ) १/२ टी स्पून वेलची पूड , २ टेबल स्पून काजू बदाम भरड , १/४ टी स्पून केशर ,१/२ वाटी दूध
पारी १ वाटी मैदा ,१वाटी रवा , १/२ वाटी दूध ,२ टेबलस्पून कडकडीत तुपाचे किंवा तेलाचे मोहन ,१/८ टी स्पून मीठ
कशी कराल
सारणाचे सगळे साहित्य एकत्र करून भांडे गॅसवर ठेवा.सतत हलवत रहा .गोळा भांड्यात तळाला न चिकटता सुटला कि सारण तयार झाले समजावे फार सैल नको. गॅस बंद करून सारण पूर्ण गार करावे
पारीचे सगळे साहित्य एकत्र करावे( दूध सोडून) गोळा दुधाने घट्ट भिजवावा लागल्यास थोडे पाणी वापरावे . ओल्या घट्ट पिळलेल्या फडक्या खाली झाकून ठेवावा १ तास पारीचा गोळा कुटून किंवा मिक्सर मध्ये किंवा फूड प्रोसेसर मध्ये चांगला फिरवून मळून घ्यावा त्याच्या १४/१५ लाट्या कराव्यात . १/१लाटी गोल लाटून १ चमचा सारण भरून अर्ध गोलाला पाण्याचा हात लावून दाबून बंद करावी मुरड घालावी किंवा काट्याने दाबून मार्क उठवावेत किंवा कातण्याने कातून कारंजी पूर्ण करावी सर्व करंज्या ओल्या घट्ट पिळलेल्या फडक्या खाली ठेवाव्यात मध्य आचेवर रिफाईंड तेलात किंवा तुपाने हलक्या ब्राउन रंगावर तळून घ्याव्यात .पूर्ण गार झाल्यावर डब्यात भराव्यात .
महत्वाचे
- मोहन नेहमीच कडकडीत घालावे धूर काढू नये.
- गुलकंद घालायचा असल्यास २ टेबल स्पून गुलकंद सारण होत आले कि घालावा आणि सारण बरोबर जरा कोरडा करावा.
- करंजी पांढरी तळू नये मऊ पडते.
- ह्या प्रमाणाच्या १४/१५ करंज्या होतात .
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा