साबुदाणा थालीपीठ

वर्षभर  अनेक  उपवास  असतात त्यासाठी मी काही डाएट उपवास रेसिपि देणार आहे 
 साबुदाणा वडा , खिचडी ह्या पेक्षा थालीपिठाला तूप दाण्याचे कूट कमी लागते 


उपासाची थाळी --- नवरात्री साठी रोज १ उपासाचा पदार्थ लिहिणार आहे
सगळ्यांचे आवडते साबुदाणा थालीपीठ

काय घ्याल------ २ वाट्या भिजवलेला साबुदाणा ,१वाटी ओल्या बटाट्याचा किस ,१ टी स्पून तिखट
(हिरव्या मिरचीचे किंवा लाल),१ टी स्पून मीठ ,१/२ टी स्पून जिरे पूड ,२ टे स्पून चिरलेली कोथिंबीर
१/२ वाटी दाण्याचे कूट
कसे कराल ------हे सर्व एकत्र करून लागेल तसे पाणी घालून छान  गोळा मळून घ्यायचा नॉन  स्टिक पॅन
वर साजूक तूप १/२ टी  स्पून पसरवून त्यावर गोळा पातळ थापून घ्या .मध्यम गॅस वर दोन्ही बाजूने खरपूस भाजून घ्या
 गोल्डन ब्राउन रंगाचे झाले पाहिजे
महत्वाचे -----१--साबुदाणा भिजवताना स्वच्छ धुवून घ्या साबुदाण्याच्या वर बोटाचे १ पेर
येईल इतकेच पाणी घाला
२--बटाटा कच्चा किसून घ्या
३--थालीपीठ पातळ लावल्यास थोडे खुटखुटीत खमंग होते
जाड लावल्यास मऊ होते

टिप्पण्या

लोकप्रिय पोस्ट