आता आंब्याचा हंगाम संपून पाऊस सुरु झाला कि फ्रिज मध्ये फ्रीझ केलेल्या आमरसाचा काही पाक कृती मी तुमच्याशी share करणार आहे  त्यातली खोबरे आणि आंबा रसाची वडी आज खाली देते आहे तिला आंब्याचा सुंदर स्वाद आहे आणि ती बाहेर ८ दिवस नक्की छान  राहते  गोड पदार्थ फ्रिज मध्ये ठेवले  कि त्याची चव नक्कीच बदलते .  आपल्या हवामात ताजे बाहेर टिकणारे पदार्थ च करावेत लवकर संपवावेत 

आंबा नारळाची वडी 

काय घ्याल ----१ वाटी ओल्या नारळाचा चव (खोबरे ),१/२ वाटी आंब्याचा रस (हापूसचा असेल तर स्वाद व रंग 
छान  येतो ) १ वाटी साखर ,१/२ टी स्पून वेलची पूड , १/२ वाटी दूध ,१/४ वाटी मिल्क पावडर 


कसे कराल ----- वरील खोबरे आणि आंब्याचा रस ,१/२ वाटी दूध सर्व मिक्सर मधून फिरवून घेणे . त्यात 
साखर मिक्स करून गॅस वर ठेवणे सतत हलवत राहणे गोळा होत आला कि वेलची पूड घालणे परत  ढवळत राहणे.   घट्ट गोळा होऊन पातेल्याला न चिकटता गोळा पातेल्यात फिरला पाहिजे सैल नको आजिबात खाली उतरवून परत घोटणे त्यात १/४ वाटी मिल्क पावडर घालणे परत घोटणे .तुपाचा हात लावलेल्या ट्रे वर थापणे 

महत्वाचे ------ १--मिल्क पावडर ऐवजी पिठी साखर घालू शकता २ टी  स्पून  पण वरील साखरेच्या प्रमाणात तेवढी साखर  कमी घ्यावी  
२-------ह्या प्रमाणाच्या मध्यम आकाराच्या  १८/२० वड्या  होतात 

३------जरा कोमट असतानाच वड्या  पाडून ठेवाव्यात पूर्ण गार  झाल्यावर  डब्यात भराव्यात 
४------वड्या  पडल्या नाहीत तर परत गोळा  पातेल्यात घालून २ टी स्पून मिल्क पावडर घालून परत घोटावे  परत  वड्या  थापाव्यात 

टिप्पण्या

लोकप्रिय पोस्ट