नमस्कार
सुप्रसिद्ध लेखिका मंगलाताई गोडबोले ह्या उत्तम लेखना  बरोबर उत्तम स्वयंपाकही करतात .झटपट, सोपे  आणि उत्तम चवीचे पदार्थ हि त्यांची
खासियत आहे त्यांचीच रेसिपी मी तुमच्या बरोबर शेयर  करते आहे  
गुळाची पोळी वेगवेगळ्या प्रकारे करतात पण कणिक ज्यास्त , कमी मैदा आणि मऊसर गुळाची पोळी खमंग आणि खुसखुशीत , कडक होते संक्रांतीला गुळाची पोळी घरोघरी केली जाते आणली जाते बहुतेक सर्वाना आवडते .गुळ  कडे पर्यंत जाणे आणि पोळी  कडक होणे हा त्यातला कौशल्याचा भाग आहे .तुम्हाला नक्कीच जमेल करून बघा आणि कंमेंट फोटो शेयर  करा  

                                      गुळाची  पोळी 


काय घ्याल ---
४ वाट्या कणिक ,१/४ टी स्पून मीठ १/२ वाटी मैदा ,२ टे स्पून कडकडीत तेलाचे मोहन  
२ वाट्या गूळ बारीक किसून घेतलेला ,२ टे .तेलावर १/२ वाटी बेसन 
 खमंग  भाजून घेणे ,१/४ वाटी बारीक तीळ कूट 

कसे कराल -----
 कणिक ,मैदा  बारीक चाळणीने चालून घेणे .त्यात मीठ आणि तेलाचे मोहन घालणे कणिक मळणें गोळा झाकून ठेवणे 
बेसन भाजून झाल्यावर गॅस बंद करून कोमट असताना त्यात गुळ  आणि तिळकूट घालून चांगले मळून घेणे 
२ छोटे गोळे कणकेचे लाटून( छोट्या पुरी सारखे ) १ का गोळ्या इतका गुळ  हाताने गोल करून  आत भरणे वर दुसरी पुरी ठेवणे .तांदूळ पिठी 
वर पातळ लाटणे  नॉन स्टिक वर भाजणे  पूर्ण गार झाल्यावर डब्यात ठेवणे 
महत्वाचे ----
१---कणिक आणि गुळाचे टेन्शन लाटण्यासाठी सारखे हवे एक घट्ट एक 
सैल नको 
२----तीळ कूट करताना तीळ भाजून पूर्ण गार करावेत थोडी साखर घालून मिक्सर मध्ये फिरवावेत म्हणजे बारीक कूट होते पोळी फुटत नाही 
३----गरम पोळी ताटात काढावी कागदावर नाही चिकटते . 
४----गुळ पिवळा आणि मऊ हवा चिक्की गूळ  नको 




टिप्पण्या

लोकप्रिय पोस्ट