आता दिवाळीची गडबड संपवून सगळ्याजणी रोजच्या कामात व्यस्त झाला आहात .आज मी तुम्हाला उपवास भाजणीची रेसिपि देणार आहे खूप छान आणि सुरेख थालीपीठे होतात
उपवास भाजणी
काय घ्याल ----- २०० ग्रॅम साबुदाणा , ४०० ग्रॅम वरई (भगर ),४०० ग्रॅम राजगिरा (कच्चा ), १/२ वाटी
जीरे
कसे कराल ----- साबुदाणा ,वरई , राजगिरा सगळे एक एक करून मंद आचेवर भाजून घ्यावे जिरे पण
मंद आचेवर भाजून घ्यावे पूर्ण गार झाल्यावर सरसरीत दळून आणावे
उपवासाचे थालीपीठ करताना त्यात त लाल तिखट, मीठ ,बारीक चिरलेली कोथिंबीर ,उकडलेला बटाटा
किंवा कच्चा बटाटा , किसून घालावा ,थोडे दाण्याचे कूट घालावे चांगले मळून तव्याला तूप लावून थालीपीठे लावावी
महत्वाचे ------ १-ज्यास्त मोठ्या आचेवर भाजू नये गुलाबी रंगावर भाजावे
२-- २वाट्या उपवास भाजणीस १ मध्यम बटाटा घ्यावा
३---२ वाट्या भाजणीस १/४ वाटी दाण्याचे कूट घालावे .

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा